किनवटमध्ये १४ व १५ फेब्रुवारीला १५ वी जागतिक बौद्ध धम्म परिषद; १० दिवसीय श्रामणेर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

 किनवट, ता.८  : समता, करुणा आणि बौद्ध धम्माच्या मूल्यांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने किनवट येथे १५ वी जागतिक बौद्ध धम्म परिषद उत्साहात आयोजित करण्यात येणार आहे. ही परिषद शनिवारी व रविवारी(ता.१४ व १५) स्मृतिशेष भदन्त अग्गपंडीत ज्ञानेश्वर महाथेरो धम्ममंच येथे पार पडणार आहे.


         समतानगर येथील भीमयान बुद्धविहार, बुद्धमूर्ती परिसर येथे होणाऱ्या या परिषदेत विविध धम्मगुरू, अभ्यासक आणि बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. परिषदेद्वारे बौद्ध धम्माचे विचार, सामाजिक परिवर्तन आणि युवकांमध्ये नैतिक मूल्यांची जपणूक यावर मार्गदर्शन केले जाणार आहे.

या परिषदेच्या अनुषंगाने ता. ०६ ते १५ फेब्रुवारी २०२६ दरम्यान १० दिवसीय श्रामणेर प्रशिक्षण शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरातून युवकांना धम्मशिक्षण, शिस्त आणि साधना यांचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
श्रामणेर शिबिराचे आयोजन दिनेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत असून धम्मसेवक म्हणून भारत गायकवाड, सिद्धांत खोब्रागडे, संघर्ष परेकार व अंकित गायकवाड कार्यरत आहेत. तसेच निखिल वाघमारे व दत्ता उद्धवराव कसबे निमंत्रक म्हणून काम पाहत असून प्रवीण गायकवाड हे मुख्य आयोजक आहेत.

परिषदेला आणि प्रशिक्षण शिबिराला परिसरातील नागरिक व धम्मप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp