नांदेडमध्ये २० वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन; साहित्य-संस्कृतीचा बहुरंगी मेळा २८ फेब्रुवारीपासून


नांदेड : विद्रोही विचारांची परंपरा आणि मराठी साहित्याची समृद्ध परंपरा जपणारे २० वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ रोजी सायन्स कॉलेज मैदान, नांदेड येथे उत्साहात पार पडणार आहे. सकाळी ९ ते रात्री १० या वेळेत विविध साहित्यिक, सांस्कृतिक आणि कलात्मक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.

    महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रेरणेतून हे संमेलन आयोजित करण्यात आले असून, विद्रोही विचारांना आणि सामाजिक परिवर्तनाला वाहिलेला हा सांस्कृतिक सोहळा ठरणार आहे.
    संमेलनात मराठी स्टँडअप कॉमेडी, हृदय कला दालन, नाट्य अभिवाचन, एकपात्री प्रयोग, गझल संमेलन, कवी संमेलन, एकांकिका, कथाकथन, परिसंवाद, रॅप साँग, गटचर्चा आणि नाटक अशा विविध कार्यक्रमांचा समावेश आहे. त्यामुळे साहित्यप्रेमींसह तरुणाईलाही आकर्षित करणारा हा बहुरंगी मेळा ठरणार आहे.
    या संमेलनात  लोकेश पवार (नागपूर),  प्रा. बबनराव विहारे (दिल्ली),  प्रकाश महाराज (मुंबई), रघु फडकेकर (मुंबई), रत्न लाल (दिल्ली) आणि प्रा. लक्ष्मण पवार (दिल्ली) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
    संमेलनाचे स्वागताध्यक्ष राहुल एस. एस. प्रधान यांनी नांदेड व परिसरातील साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संमेलन यशस्वी करावे, असे आवाहन केले आहे.विद्रोही विचार, साहित्य, कला आणि सामाजिक जाणीव यांचा संगम असलेले हे संमेलन नांदेडच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारे ठरणार आहे.

Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp