माहूर येथे ‘भीम महोत्सव २०२६’ ; दणदणीत भिमगीतांचा मुकाबला २२ फेब्रुवारीला


माहूर : त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त माहूर येथे भव्य ‘भीम महोत्सव २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता बुद्धभूमी परिसर, स्मृतीशेष शशिकला रघुनाथ मुळे  मंच, माहूर जि. नांदेड येथे हा महोत्सव रंगणार आहे.

या कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्षपदी प्रा. प्रकाश गायकवाड ,अध्यक्ष, पंचशील विद्यालय, लखमापूर, तर उद्घाटक म्हणून युवा उद्योजक तथा समाजसेवक सिध्दांतभाऊ उदरे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष  फिरोज दोसानी ,नगर पंचायत, माहूर असतील.
   कार्यक्रमाचे अध्यक्ष रेणुकादास वानखेडे, निमंत्रक सुनील गायकवाड, उपाध्यक्ष पंजाबराव घावळट, तसेच संयोजक विजय मुजमुले आणि राहुल कांबळे हे जबाबदारी सांभाळत आहेत.
   या महोत्सवात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक फैजान ताज (नागपूर) आणि गायिका मंजुषाताई शिंदे (पुणे) यांचा “बुद्ध-भीम गीतांचा दणदणीत मुकाबला” रात्री ९ वाजता रंगणार असून, रसिकांना उत्कृष्ट सांस्कृतिक मेजवानी मिळणार आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक आकाश रमेश कांबळे (मो. 9325243558) आणि अर्जुन विनोद बरडे (मो. 8080118470) यांनी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन केले आहे.
    माता रमाई आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन करत सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक वातावरणात हा महोत्सव पार पडणार असून परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp