किनवट, ता.९ : येणाऱ्या उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाई रोखण्यासाठी वेळेवर उपाययोजना राबवण्यासाठी आमदार भीमराव केराम यांच्या अध्यक्षतेखाली आज (ता.९) आढावा बैठक झाली.
तालुक्यातील गावांतील पाणीपुरवठा, उपलब्ध जलस्रोत आणि टंचाई निवारण उपायांवर सविस्तर चर्चा झाली.बैठकीस गट विकास अधिकारी जयश्री वाघमारे, संबंधित अधिकारी-कर्मचारी, सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते. विहिरी-बोअरवेल अधिग्रहण, टँकरद्वारे पाणीपुरवठा, जलस्रोत संवर्धन व दुरुस्ती कामे वेळेवर पूर्ण करण्याचे निर्देश आमदार केराम यांनी दिले.ग्रामपातळीवरील अडचणी जाणून घेऊन नियोजन करण्यावर भर देण्यात आला. प्रशासनाने समन्वय साधून प्रभावी पावले उचलावीत, असे आवाहनही करण्यात आले.
Tags
तालुका
