किनवटच्या प्रा. बाळू भंडारे यांना पीएचडी पदवी; संत साहित्यावर संशोधनाची दखल

प्रा.बाळू भंडारे

किनवट : येथील सरस्वती शिक्षण संस्था संचलित सरस्वती विद्यामंदिर कला महाविद्यालयातील मराठी विषयाचे सहाय्यक प्राध्यापक प्रा. बाळू आनंद भंडारे यांना पीएचडी (डॉक्टरेट) पदवी प्राप्त झाली आहे. त्यांच्या या यशामुळे शैक्षणिक व साहित्य क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून महाविद्यालयाच्या लौकिकात भर पडली आहे.

    प्रा. भंडारे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथे “निवडक संतांच्या साहित्यातील पर्यावरण विषयक विचार मूल्यांचा विवेचक अभ्यास” या विषयावर संशोधन प्रबंध सादर केला. त्यांच्या या संशोधन कार्याला संत रामदास कला, विज्ञान महाविद्यालय, घनसावंगी (जि. जालना) येथील मराठी विभागाचे प्रा. डॉ. मारोती घुगे यांचे मार्गदर्शन लाभले.
      प्रा. भंडारे यांनी पदव्युत्तर शिक्षण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथे पूर्ण केले असून त्यांच्या अनेक संशोधन निबंध व ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. मराठी साहित्य व संशोधन क्षेत्रात त्यांनी सातत्याने मोलाचे योगदान दिले आहे.ते सरस्वती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आनंद भंडारे यांचे सुपुत्र आहेत. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व्यंकटराव नेम्मानिवार, प्रा. रामप्रसाद तौर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. तुकाराम रोंगटे, डॉ. अनुजा पाटील, संस्थेचे सचिव कृष्णकुमार नेमानीवार, महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. मार्तंड कुलकर्णी तसेच डॉ. द्वारकाप्रसाद वायाळ, डॉ. सुनील व्यवहारे, प्रा. तपनकुमार मिश्रा, डॉ. आण्णासाहेब सोळंके, व्यंकट सातूरवार आदींसह महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी  प्रा. भंडारे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp