किनवट : आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर एलपीजी गॅस पुरवठा सुरळीत राहावा आणि नागरिकांच्या तक्रारींचे तत्काळ निवारण व्हावे, यासाठी नांदेड जिल्ह्यात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड (पुरवठा विभाग) यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये “तालुका नियंत्रण कक्ष” स्थापन करण्यात येत आहेत.
किनवट तालुक्यात या नियंत्रण कक्षाच्या प्रमुखपदी निरीक्षण अधिकारी तहसील कार्यालयाचे निलेश राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच तक्रार निवारण सहाय्यक म्हणून सतीश सरनाईक (पु.नि. तहसील कार्यालय, किनवट) यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.
नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून एलपीजी संदर्भातील तक्रारींचे तत्काळ निराकरण, गॅस वितरण व्यवस्थेवर प्रभावी नियंत्रण आणि पारदर्शकता राखण्यावर भर दिला जाणार आहे. नियंत्रण कक्ष प्रमुखांवर संपूर्ण यंत्रणेची देखरेख, प्राप्त तक्रारींचे परीक्षण, आवश्यकतेनुसार गॅस एजन्सींना भेट देणे तसेच गरज पडल्यास पोलीस प्रशासनाच्या मदतीने कारवाई करणे, अशा जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत.
तक्रार निवारण सहाय्यकांकडून दररोज लेखी, तोंडी व दूरध्वनीद्वारे येणाऱ्या तक्रारींची नोंद ठेवून त्या संबंधित गॅस एजन्सीकडे पाठविणे, त्यांचा पाठपुरावा करणे आणि त्याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करणे अपेक्षित आहे.
याशिवाय, गॅसचा कृत्रिम तुटवडा किंवा काळाबाजार टाळण्यासाठी नियमित तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले असून, प्रत्येक दिवसाचा अहवाल जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
हा आदेश तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आला असून, एलपीजी पुरवठा सुरळीत
M 0
Mvrv प्रशासनाने कडक पावले उचलल्याचे स्पष्ट होत आहे.