किनवट : जागतिक महिला दिनानिमित्त आज (ता.८)संथागार येथील वृद्धाश्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. ॲड. आकांक्षा आळणे यांच्या पुढाकारातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरपरिषदेच्या अध्यक्षा सुजाता एन्ड्रलवार या होत्या, तर स्वागताध्यक्ष म्हणून सामाजिक कार्यकर्त्या शिला बनसोड यांनी जबाबदारी सांभाळली. नगर परिषदचे उपनगराध्यक्ष हसन लाला व युवानेते करण एन्ड्रलवार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी नगरसेविका ललिता मुनेश्वर, संगिता पाटील (एनजीओ), डॉ. प्रज्ञा बहादुरे, प्रिती नेम्मानिवार, निलोफर भाटी, निकिता आयनेनिवार, ऐश्वर्या धात्रक, रेवती पवार, सपना मंडारे, हर्षावर्धना पाटील, रोहिणी मुनेश्वर, सूर्सकांता सर्पे, निकिता कांबळे, पुनम सोनकांबळे, शशीकला कांबळे, आत्मानंद सत्यवंश, बंडू गौरकर, शिवा साखरे, कांचन कांबळे, सपना कसबे, दिव्या राठोड आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात मुलींनी सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांच्या जीवनावर आधारित समूहनृत्य सादर करून महिला शिक्षणाच्या लढ्याची प्रेरणादायी झलक उभी केली. या नृत्यात अनुष्का, दिव्या, अंजली, अनुजा, कशीष व मिष्टी यांनी सहभाग घेतला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी सोळंके यांनी केले, तर आभार प्रदर्शन अतुल बनसोड यांनी केले.
Tags
||महाराष्ट||
