किनवट, ता.८ : भारत जोडो युवा अकादमी संचलित साने गुरुजी इमर्जन्सी व मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटलच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त रविवारी (ता.८) विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोक बेलखोडे यांच्या नेतृत्वाखाली सकाळी १० वाजता आयोजित कार्यक्रमात महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ९ कर्तबगार महिलांचा (नवरत्नांचा) सन्मान करण्यात आला.
महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने एमआयडीसी, नांदेड रोडवरील साने गुरुजी
इमर्जन्सी व मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल येथे हे मोफत आरोग्य तपासणी शिबिर पार पडले. या शिबिरात डॉ. दुर्गा काकडे, डॉ. विद्या गोलकोंडावार, डॉ. रुतुजा चाडावार आणि डॉ. वैष्णवी पदमावार यांनी उपस्थित महिलांची विनामूल्य आरोग्य तपासणी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. भाग्यश्री बेलखोडे-वरटकर यांनी केले.
इमर्जन्सी व मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल येथे हे मोफत आरोग्य तपासणी शिबिर पार पडले. या शिबिरात डॉ. दुर्गा काकडे, डॉ. विद्या गोलकोंडावार, डॉ. रुतुजा चाडावार आणि डॉ. वैष्णवी पदमावार यांनी उपस्थित महिलांची विनामूल्य आरोग्य तपासणी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. भाग्यश्री बेलखोडे-वरटकर यांनी केले.
यावेळी केवळ आरोग्य सेवा पुरविण्यावर भर न देता समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला. अंगणवाडी सेविका कांता कांबळे, अंगणवाडी मदतनीस ललिता वाघमारे, आशा वर्कर अर्चना गुडसेवार, आरोग्य सेविका सुनंदा नामदेव येसंबरे, बचतगट प्रतिनिधी लक्ष्मीबाई कोटनाक, बी.एम. आरोग्य पर्यवेक्षिका, शिक्षिका पुण्यरथा उमरे-तामगाडगे, महिला सरपंच सुनिता आत्राम तसेच शिवलिला घूले या ९ महिलांचा विशेष सत्कार करून त्यांना प्रोत्साहन देण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन तालुका आरोग्य अधिकारी के. पी. गायकवाड यांच्या हस्ते झाले. यावेळी मंचावर संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोक बेलखोडे, डॉ. सुनंदा घडसिंग, डॉ. वंदना पत्की आणि डॉ. भाग्यश्री बेलखोडे उपस्थित होते. डॉ. शिवाजी गायकवाड यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दुर्गा काकडे यांनी केले, तर नेहा गिते यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भारत जोडो युवा अकादमी आणि साने गुरुजी इमर्जन्सी व मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटलच्या सर्व कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.
Tags
||महाराष्ट||

