किनवट-माहूर विधानसभेत बसपची नवी कार्यकारणी जाहीर; संघटन बळकटीसाठी बैठक संपन्न


किनवट, ता. १७ : बहुजन समाज पार्टीच्या वतीने किनवट-माहूर विधानसभा क्षेत्रासाठी नव्या कार्यकारणीची घोषणा करण्यात आली. यासाठी किनवट येथील शासकीय विश्रामगृह, गोकुंदा येथे महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. बैठकीस महाराष्ट्र राज्य, नांदेड जिल्हा तसेच किनवट-माहूर विधानसभा क्षेत्रातील आजी-माजी पदाधिकारी, हितचिंतक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

       बैठकीच्या प्रारंभी स्थानिक कार्यकर्त्यांची मते जाणून घेत संघटन अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला. महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी सदस्य  चंद्रप्रकाश देगलूरकर, मराठवाडा झोन प्रभारी  मनीष भाऊ कावळे, जिल्हाध्यक्ष  सुभाष भोकरे, जिल्हा महासचिव  सुधाकर सरोदे, जिल्हा कोषाध्यक्ष  सखाराम मामा इंगोले व मिलिंद धावारे यांच्या मार्गदर्शनाखाली नव्या कार्यकारणीची निवड जाहीर करण्यात आली.
    ज्ञयामध्ये किनवट-माहूर विधानसभा प्रभारी म्हणून अशोक पाटील व चंद्रकांत कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली. विधानसभा अध्यक्षपदी भीमराव पाटील, उपाध्यक्षपदी दिलीप भालेराव, महासचिवपदी संजय ठोके, कोषाध्यक्षपदी रेणुराव मुनेश्वर तर बी.व्ही.एफ. संयोजकपदी भगवान घुले बॉम्बसेफ यांची निवड करण्यात आली.
     या बैठकीस लक्ष्मीकांत सुंदरगिरवार, प्रा. डॉ. आनंद भालेराव, दीपक दादा ओंकार, बोधी कदम, मुन्ना भाऊ वाठोरे, नरेश गायकवाड, सी. जी. सोनुले, भारत वाघमारे, युवराज रिंगणमोडे, जयवंत येरेकर, आनंदराव किसन, यशवर्धन पाटील आदींसह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
बैठकीत संघटन मजबूत करण्यासाठी आगामी काळात विविध उपक्रम राबवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp