“लेक वाचवा, लेक शिकवा” संदेश देणारी रांगोळी ठरली आकर्षणाचा केंद्रबिंदू


किनवट,ता.१२ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व महात्मा ज्योतिबा फुले जयंती यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त काल(ता.११) ‌गोंड राजा मैदान, किनवट येथे विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 

    याच पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेत ॲड. दीपा सोनकांबळे यांनी साकारलेली “लेक वाचवा, लेक शिकवा, उद्याची सुंदर पिढी घडवा” या विषयावरील रांगोळी विशेष लक्षवेधी ठरली.
या रांगोळीतून मुलींचे शिक्षण, त्यांचे संरक्षण आणि समाजातील त्यांचे महत्त्व याबाबत प्रभावी संदेश देण्यात आला. रंगांच्या आकर्षक वापरासह कल्पक मांडणीमुळे उपस्थित नागरिकांनी या रांगोळीचे कौतुक केले.
   स्पर्धेदरम्यान अनेक स्पर्धकांनी विविध सामाजिक विषयांवर आधारित रांगोळ्या सादर केल्या; मात्र ॲड. सोनकांबळे यांच्या रांगोळीने “बेटी बचाओ, बेटी पढाओ” या संकल्पनेचा प्रभावी प्रचार करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.या उपक्रमामुळे समाजामध्ये मुलींच्या शिक्षणाबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत होणार असून, अशा स्पर्धा सामाजिक परिवर्तनासाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp