किनवट :
फुले-आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समितीच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांची द्विशताब्दी जयंती आज (ता.११) सकाळी १० वाजता मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी बसस्थानकाजवळील महात्मा जोतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याजवळ मुख्य सोहळा पार पडला. कार्यक्रमादरम्यान आमदार भीमराव केराम यांच्या अध्यक्षतेखाली प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या प्रसंगी नगराध्यक्षा सुजाता येंड्रलवार तसेच मार्क्स-फुले-आंबेडकरवादी विचारवंत प्रा. रामप्रसार तौर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी महात्मा फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन महेंद्र नरवाडे यांनी केले. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संयुक्त जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष निखिल सर्पे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
या जयंती उत्सवाला विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
||महाराष्ट||
