कोल्हापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर १३५ व्या जयंतीनिमित्त देशभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर येथे ‘राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट, कोल्हापूर’ यांच्या वतीने विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार व लेखक मधू कांबळे यांनी “डॉ. बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली सामाजिक लोकशाही किती पुढे, किती मागे?” या विषयावर अभ्यासपूर्ण व विचारप्रवर्तक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत व लेखक डॉ. अशोक चौसाळकर होते.
व्याख्यानादरम्यान मधू कांबळे यांनी सभागृहात उपस्थित मान्यवरांचा उल्लेख करताना युवा, उदयोन्मुख लेखक सिद्धार्थ कांबळे यांचा विशेष उल्लेख केला. त्यांच्या या उल्लेखामुळे उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
मधू कांबळे हे सामाजिक व राजकीय विषयांवर सखोल लेखन करणारे नाव असून, ‘समतेचा करार’ आणि ‘जाती मोजायच्या की गाडायच्या?’ यांसारखी त्यांची पुस्तके चर्चेत आहेत. तसेच विविध माध्यमांवरील त्यांच्या मुलाखतींमधून त्यांनी जातनिर्मूलन व सामाजिक समतेचे मुद्दे प्रभावीपणे मांडले आहेत. ‘लोकसत्ता’मध्ये सहसंपादक म्हणून त्यांनी केलेले कार्यही उल्लेखनीय आहे.
कार्यक्रमानंतर सिद्धार्थ कांबळे यांनी डॉ. अशोक चौसाळकर यांना त्यांच्या ‘वंचितांचे राजकारण...’ या पुस्तकाची प्रत भेट दिली. यावेळी मधू कांबळे उपस्थित होते.
Tags
||महाराष्ट||
