गोकुंदा येथील सु-संस्कार निवासी मतीमंद विद्यालयात विधी सेवा समितीचे कायदेविषयक शिबिर उत्साहात

किनवट : तालुका विधी सेवा समिती, किनवटच्या वतीने गोकुंदा (ता. किनवट) येथील सु-संस्कार निवासी मतिमंद विद्यालयात नुकतेच कायदेविषयक जनजागृती शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरातून विद्यार्थी व पालकांमध्ये कायद्याविषयी जागरूकता निर्माण करण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश पी. एम. माने हे होते. यावेळी वकील  संघाचे उपाध्यक्ष टी. आर. चव्हाण यांच्यासह सदस्य डी. जी. काळे, पी. पी. गावंडे, विलास शामीले,  दिपा सोनकांबळे, पी. जी. घुले आणि बी. बी. कानींदे (सर्व वकील)उपस्थित

होते.
    शिबिरात अॅड. दिपा सोनकांबळे यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना विविध कायदे, हक्क आणि शासकीय सुविधा याबाबत सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. विशेषतः दिव्यांग विद्यार्थ्यांचे हक्क, शिक्षण व संरक्षण यावर त्यांनी प्रकाश टाकला.
यावेळी विद्यार्थ्यांना फळांचे वाटप करण्यात आले, तर उपस्थित पालकांसाठी मिष्ठान्न भोजनाची व्यवस्था करण्यात आली. कार्यक्रमामुळे शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
या शिबिराच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. वायकुळे यांच्यासह श्री . शिंदे , श्री.डहाके , श्री .अस्वले  यांनी विशेष पुढाकार घेतला. त्यांना शिक्षकेत्तर कर्मचारी श्रीमती जाधव, श्री. मनोहरे, श्री. ढगे, श्री. आईटवार, श्री. अमृते, श्री. बिरादार, श्री. कदम आणि श्री. पांढरे यांनीही सहकार्य केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. तोडकर  यांनी केले, तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक श्री. वायकुळे यांनी मानले.

Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp