किनवट : किनवट तालुका विधी सेवा समिती व अभिवक्ता संघ, किनवट यांच्या संयक्त विद्यमाने येत्या ९ मे रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या लोकअदालतीच्या यशस्वी नियोजनासाठी किनवट न्यायालयात महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली.
या बैठकीस जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेडचे सचिव शरद देशपांडे, किनवटचे दिवाणी न्यायाधीश पी. एम. माने, सहायक न्यायाधीश के. जी. मेंढे, अभिवक्ता संघाचे अध्यक्ष ॲड. किशोर मुनेश्वर तसेच ज्येष्ठ वकील सुभाष ताजने यांच्यासह सर्व वकील, पोलीस विभागाचे अधिकारी, विविध बँकांचे अधिकारी आणि पंचायत समितीचे बीडीओ उपस्थित होते.
बैठकीत लोकअदालतीत जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वय साधून कार्य करण्यावर भर देण्यात आला. नागरिकांनीही या लोकअदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन अभिवक्ता संघाचे कोषाध्यक्ष ॲड. सम्राट सर्पे यांनी केले. येत्या ९ मे रोजी होणारी लोकअदालती यशस्वी करण्याचा निर्धार यावेळी सर्वांनी व्यक्त केला.
Tags
||जिल्हा||
