नांदेड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त डॉ. बी. आर. आंबेडकर फाऊंडेशन, नांदेडतर्फे ‘कृष्णाई पुरस्कार वितरण सोहळा–२०२६’ शनिवारी सायंकाळी ६ वाजता हॉटेल ताज पाटील येथे आयोजित करण्यात आला आहे. यंदा सोहळ्याचे २४ वे वर्ष असून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किनवट विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव केराम राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. जोगेंद्र कवाडे, आमदार हेमंत पाटील, सुभाष वानखेडे, फारुक अहमद, आमदार बालाजी कल्याणकर, आनंद बोंढारकर व आमदार बाबूराव कोहळीकर यांची उपस्थिती राहणार आहे.
यंदाचे पुरस्कार विजेते पुढीलप्रमाणे :
प्रा. डॉ. लक्ष्मीकांत तांबोळी यांना ‘समता गौरव’ पुरस्कार, मिकी घई यांना राज्यस्तरीय ‘कृष्णाई’ पुरस्कार, तर मुक्तेश्वर पाटील यांना जिल्हास्तरीय ‘कृष्णाई’ पुरस्कार जाहीर झाला आहे. याशिवाय विजय होकर्णे (छायाचित्रण), डॉ. मनोज गिमेकर (ग्रामीण पत्रकारिता) आणि अतुल अनिल राजुरकर (यूपीएससी उत्तीर्ण) यांचाही सन्मान होणार आहे.
आंबेडकरी समाजातील काही नगरसेवकांचाही यावेळी गौरव करण्यात येणार असून इंजि. प्रशांत इंगोले (गटनेते) व मुन्ना अब्बास यांचा त्यात समावेश आहे.स्वागत समितीत पंढरीनाथ बोकारे, रविंद्रसिंघ मोदी, प्रा. डॉ. राजपालसिंह चिखलीकर व प्रा. डॉ. नितीन गायकवाड यांचा समावेश आहे. कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Tags
||जिल्हा||
