किनवटमध्ये फुले-आंबेडकर संयुक्त जयंती उत्सवात जल्लोषात साजरी होणार

 किनवट : राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांची १९९ वी व राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी संयुक्त जयंती उत्सव सोहळा किनवट येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. सार्वजनिक भिम जयंती महोत्सव समिती, सिद्धार्थनगर यांच्या वतीने ११ ते १४ एप्रिल २०२६ दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सार्वजनिक फुले -आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष  निखिल सर्पे यांनी दिली.

       या महोत्सवाची सुरुवात शनिवारी (ता.११)  सकाळी ११ वाजता महात्मा फुले चौक येथे अभिवादन सोहळ्याने होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार भीमराव केराम राहणार असून नगराध्यक्षा सुजाताताई येंड्रलवार उद्घाटक म्हणून उपस्थित राहतील. खासदार नागेश पाटील आष्टिकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
    १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर

जयंतीनिमित्त मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी पंचशील ध्वजारोहण, बुद्ध वंदना, तसेच जेतवन बुद्ध विहार येथे विशेष कार्यक्रम होणार आहेत. दुपारी भोजनदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून सायंकाळी शहरातून डॉ. आंबेडकर यांच्या तैलचित्राची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.
   दरम्यान, ११ एप्रिल रोजी कविसंमेलन, स्पर्धा परीक्षा, १२ एप्रिल रोजी सांस्कृतिक कार्यक्रम, १३ एप्रिल रोजी रांगोळी स्पर्धा व महिलांसाठी संगीत खुर्ची स्पर्धा अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व स्पर्धांतील विजेत्यांना रोख बक्षिसांसह प्रमाणपत्र व संविधान पुस्तक देण्यात येणार आहे.
    या महोत्सवात विविध मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून मोठ्या संख्येने नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन  फुले- आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समिती पदाधिका-यांकडून करण्यात आले आहे.
Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp