परिषदेचे उद्घाटन पुणे येथील ज्येष्ठ विचारवंत रमेश राक्षे यांच्या हस्ते होणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून विकास पाथरीकर व अशोक पालके उपस्थित राहणार आहेत. पहिल्या सत्राचे अध्यक्ष प्रा. डॉ. शरद गायकवाड हे असून, सुनिल अडगळे (सर) व श्रीकांत कसबे यांचीही उपस्थिती राहणार आहे. या सत्रात “बहुजन महापुरुषांच्या चळवळीत मातंग समाजाचे सक्रीय योगदान व सद्यस्थिती” या विषयावर मार्गदर्शन केले जाणार आहे.
दुपारनंतरच्या दुसऱ्या सत्राचे अध्यक्ष प्रा. सुकुमार कांबळे असतील. उद्घाटक म्हणून श्रावण क्षीरसागर, तर प्रमुख पाहुणे म्हणून सुदर्शन चकाले उपस्थित राहतील. यावेळी प्रा. डॉ. विजयकुमार कुमठेकर व बिभिषन रणदिवे यांचेही मार्गदर्शन लाभणार आहे. “राजा ते पोतराजा झालेल्या समाजाच्या अवस्थेस जबाबदार कोण? आंबेडकर चळवळीतील मातंग समाजाचे योगदान” या विषयावर सखोल चर्चा होणार आहे.
या परिषदेच्या माध्यमातून मातंग समाजाच्या ऐतिहासिक योगदानाचा आढावा घेण्याबरोबरच सध्याच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थितीवर चिंतन करून पुढील दिशा ठरवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी युवराज पवार (जिल्हाध्यक्ष), श्रीकांत देडे, हिरालाल अडगळे, प्रा. डॉ. दिगंबर झोबांडे, अमोल पोटफोडे, बंडू लोखंडे, नानासाहेब लोखंडे, प्रा. डॉ. परमेश्वर हाटकर, प्रा. डॉ. दीपक देडे, अॅड. उमेश पवार, प्रमोद खंदारे यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.