महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय गोकुंदा गुणवत्तापूर्ण निकालाची परंपरा कायम !

 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी -मार्च २०२६ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) बारावीच्या परीक्षेचा निकाल राज्य शिक्षण मंडळाकडून दिनांक ०२/०५/२०२६ रोजी परीक्षा मंडळाच्या विहित कार्यपध्दती नुसार ऑनलाईन जाहीर करण्यात आला.

यामध्ये मिलिंद शिक्षण प्रसारक मंडळ अंबाडी, व्दारा संचलित, महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय गोकुंदा किनवट ने याही वर्षी आपल्या उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखत शैक्षणिक आलेख उंचावत ठेवला आहे.

महाविद्यालयाच्या २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात विज्ञान शाखेतुन एकुण ४५४ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट होते.त्यापैकी ४३५ विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले.९६.००टक्के निकाल हा विज्ञान शाखेचा असुन यामध्ये प्रथम श्रेणी (६०%पेक्षा जास्त) ७६ विद्यार्थी, विशेष प्रावीण्य (७५%पेक्षा जास्त) ११ विद्यार्थी ,(८०%पेक्षा जास्त) ०३ विद्यार्थी यांनी अतिविशेष प्रावीण्य प्राप्त केले आहे.

विज्ञान शाखेतुन सर्वाधिक गुण घेवून कु.अनुष्का संजय कावळे-८४.६७ % ही प्रथम ,विघ्नेश बालाजी पोपुलवाड ८१.५०% हा व्दितीय तर कु. प्राप्ती फुलाजी भोंगाळे हिने ८०.५०% गुण घेवून तृतीय क्रमांक पटकावला आहे. विज्ञान शाखेतून हॉर्टिकल्चर या विषयात २०० पैकी २०० गुणांसह कु.अनुष्का संजय कावळे,आणि कु. समीक्षा प्रशांत डवरे हिने दैदीप्यमान यश संपादन केले आहे.

कला शाखेतुन एकुण २४२ विद्यार्थी हे परीक्षेस प्रविष्ट होते .कला शाखेचा निकाल ६२% आहे.यामध्ये प्रथम श्रेणी (६०%पेक्षा जास्त) २१ ,विशेष प्रावीण्यात (७५%पेक्षा जास्त) ०५ , अतिविशेष पुरविण्यात (८०%पेक्षा जास्त) ०३ एवढे विद्यार्थी गुणानुक्रम उत्तीर्ण झाले. 

कला शाखेतुन सर्वाधिक गुण घेवून कु. नंदिनी संतोष बोईनवाड -८९.६७ % ही प्रथम,कु. नंदिनी संतोष कोरेवाड ८६.००% ही व्दितीय तर प्रदीप इंदल जाधव याने ८१.००% गुण घेवून तृतीय क्रमांक पटकावला आहे. कला शाखेतुन किनवट तालुक्यातून प्रथम येण्याचा बहुमान कु.नंदिनी संतोष बोईनवाड या विद्यार्थिनीने तर विज्ञान शाखेतून कु. अनुष्का संजय कावळे हिने प्राप्त केलेला आहे 

 विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे सचिव अभि.प्रशांत ठमके, कोषाध्यक्षा शुभांगीताई ठमके, मुख्याध्यापक तथा प्राचार्य प्रमोद मुनेश्वर,उपप्राचार्य श्याम जाधवउपमुख्याध्यापक किशोर डांगे पर्यवेक्षक प्रा. संतोष बैसठाकुर,प्रा रघुनाथ इंगळे, मनोज भोयर, मुकुंद मुनेश्वर आणि महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका शिक्षकेतर कर्मचारी,आदींनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp