किनवट, ता.३: तंजीम रहनुमा-ए-कारवाँतर्फे तमाम मुस्लिम बांधवांसाठी किनवट शहरात १४ व्या सामूहिक (इज्तेमाई) विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा शुक्रवार, दिनांक ८ मे २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता एन. के. गार्डन, गोकुंदा रोड, किनवट (जि. नांदेड) येथे पार पडणार आहे.
संस्थेच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, मागील १३ वर्षांपासून सातत्याने आर्थिकदृष्ट्या गरजू कुटुंबांना दिलासा देण्यासाठी हा सामूहिक विवाह उपक्रम राबविण्यात येत आहे. अल्लाहच्या कृपेने आणि समाजातील दात्यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीपणे सुरू असून, यंदाही मोठ्या प्रमाणावर जोडप्यांचा विवाह सोहळा पार पडणार आहे.
या आनंदाच्या प्रसंगी नागरिकांनी आपल्या मित्र-परिवारासह उपस्थित राहून नवविवाहित जोडप्यांना शुभेच्छा द्याव्यात, तसेच या सामाजिक उपक्रमाला पाठिंबा देत सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
Tags
||जिल्हा||
