डॉ. बाबासाहेबांची प्रतिमा आमच्या समाजाचं अस्तित्व आहे - सुरेशदादा गायकवाड

नांदेड : आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भव्य प्रतिमा लावून दरवर्षी जयंती मोठ्या हर्षउल्हासात साजरी करतो ही डॉ. बाबासाहेबांची प्रतिमा म्हणजेचआमची प्रेरणा आहे, ही एक आमची ऊर्जा आहे त्यामुळे डॉ.


बाबासाहेबांची जयंती मोठ्या उत्साहात जगभर साजरी होते आणि ती साजरी झालीच पाहिजे असे प्रतिपादन आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते सुरेशदादा गायकवाड यांनी शहरातील भैय्यासाहेब आंबेडकर नगर येथील प्रज्ञा करुणा विहाराच्या प्रांगणात नगरसेवक प्रतिनिधी रमेश गोडबोले मित्र मंडळाच्या वतीने आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या 2570 व्या जयंती निमित्त बुद्ध भिम गीतांचा भव्य कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात प्रतिपादन केले.

      यावेळी विचार मंचावर प्रमुख जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, सुखदेव चिखलीकर, काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. दिनेश निखाते, माजी नगरसेवक प्रतिनिधी सुरेश हाटकर, सामाजिक कार्यकर्ते शशिकांत भुसेवाड, नगरसेविका सौ. ज्योत्सना राजू गोडबोले, नगरसेवक प्रतिनिधी अब्दुल फईम, अब्दुल मुनीर, नगरसेवक सय्यद शोएब मजर हुसेन, नगरसेवक मोहसीन खान आदींची प्रमुख उपस्थिती होती. या भव्य कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक प्रतिनिधी रमेश गोडबोले मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले होते.
     पुढे बोलताना सुरेशदादा गायकवाड म्हणाले की,बाबासाहेबांच्या जीवनाची सुरुवात वर्गाच्या बाहेर राहून झाली. त्याच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या महान कार्याने तुमचं आमचं जीवन आसमंताप्रमाणे उजळून निघालं.आज खऱ्या अर्थाने ती जयंती आपण साजरी करतो या जयंतीच्या निमित्ताने एक जनजागरणाची, प्रबोधनाची मोहीम म्हणून आपण साजरी करतो बाबासाहेबांची जयंती हा काही कोणता नागपंचमीचा सण नाही, हि काही शिमग्याची बोंब नाही आणि बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणजे दिवाळी पण नाही बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही त्यांच्या विचाराची दररोज उजळणी होत असते आणि त्यांच्या विचारातून मला काय घ्यायचं आणि मला पुढे कसं जायचं याचा प्रत्येक माणूस आपापली दिशा ठरवत असतो. डॉ.बाबासाहेबांच्या हातामध्ये सोन्याचा ब्रासलेट नव्हती, तलवार नव्हती त्यांच्या हातात पेन होती म्हणून आताच्या तरुणांनी हातात ब्रासलेट, हत्यार न घेता, कोणत्याशी व्यसनाच्या आहारी न जाता बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचा जो विचार दिला त्या विचाराच्या बरहुकूम या पुढच्या काळामध्ये आपल्याला कार्य करणे आवश्यक असल्याचे सुरेशदादा म्हणाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत गौतम बुद्ध, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. त्यानंतर आकाश मोजतो आम्ही भीमा तुझ्या मुळे फेम प्रसिद्ध गायक वैभव खुने, गायक तुषार वणे यांनी.


माझ्या कुंकवाच्या खाली भिम मूर्ती आहे कोरली, सोनियाची उगवली सकाळ, साजरी भिजयंती करू आदी एकाहून एक सरस बुद्ध - भिम गिते गाऊन श्रोत्यांच्या मनात क्रांतीची मशाल पेटवली. सूत्रसंचालन भगवान येवले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नगरसेवक प्रतिनिधी रमेश गोडबोले मित्र मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला शहरातील बौद्ध उपासक- उपासिका यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
युवकांनी डॉ.बाबासाहेबांच्या विचारानुसार जीवन जगावे - पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार 
डॉ. बाबासाहेबांनी जो मार्ग दाखवलेला आहे तो म्हणजे अभ्यास करण्याचा, समाजासाठी काहीतरी सकारात्मक काम करण्याचा त्यामध्ये सर्व युवकांनी सहभागी झाले पाहिजे. गुन्हेगारीच जे चक्र आहे त्यामध्ये आपण न जाता, भाईगिरी,दादागिरी मध्ये छोट-मोठ भांडण करून पोलीस स्टेशनच्या फेऱ्या मारत राहणे तसेच कोर्ट कचेरीमध्ये खूप वेळ जातो, पैसा जातो यासाठी प्रत्येक युवकांनी तिकडे न जाता डॉ. बाबासाहेबांच्या विचारानुसार वागून चांगले जिवन जगावे. या परिसरातील मुलांना काहीतरी चांगलं मार्गदर्शन करण्यासाठी मी येथे आलो तसेच आपल्या सोबत पोलीस प्रशासन सदैव तत्पर असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार म्हणाले.


Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp