किनवट : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेचा निकाल राज्य शिक्षण मंडळाकडून दिनांक ०८/०५/२०२६ रोजी परीक्षा मंडळाच्या विहित कार्यपध्दती नुसार ऑनलाईन जाहीर करण्यात आला.
यामध्ये मिलिंद शिक्षण प्रसारक मंडळ अंबाडी, व्दारा संचलित, महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक विद्यालय गोकुंदा तालुका किनवट ने या वर्षीही आपल्या उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखत शैक्षणिक आलेख उंचावत ठेवला आहे.
विद्यालयाच्या २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात सेमी इंग्रजी माध्यमातून एकुण ३२० विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट होते. त्यापैकी ३१३ विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले. सेमी इंग्रजी माध्यमाचा निकाल ९८.००टक्के लागला असून यामध्ये प्रथम श्रेणीत (६०% पेक्षा जास्त) ८९ विद्यार्थी, विशेष प्रावीण्य (७५% पेक्षा जास्त) ९७ विद्यार्थी तर (९०% पेक्षा जास्त) २६ विद्यार्थी यांनी अतिविशेष प्रावीण्य प्राप्त केले आहे. यामध्ये गुणाणुक्रमे आलेले विद्यार्थी
१) कु. केतकी गजानन डवरे (९८.४०%). प्रथम.
२) कु. श्रुती नरेंद्र कोगुरवार (९७%) ही द्वितीय. तर
३ ) कु. प्रेरणा नगसेन तामगाडगे (९६%) हिने तृतीय क्रमांक पटकावला.
मराठी माध्यमात एकूण १५७ विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट होते. त्यापैकी १२८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मराठी माध्यमाचा एकूण निकाल ८२.००% इतका लागला असून शाळेचा एकूण निकाल ९२.४५% इतका लागला आहे. मराठी माध्यमामध्ये प्रथम श्रेणीत (६०% पेक्षा जास्त) 36 विद्यार्थी, विशेष प्रावीण्य (७५% पेक्षा जास्त) ०८ विद्यार्थी तर (८०% पेक्षा जास्त) ०४ विद्यार्थी यांनी अतिविशेष प्रावीण्य प्राप्त केले आहे. मराठी माध्यमात सर्वाधिक गुण घेऊन गुणाणुक्रमे आलेले विद्यार्थी.
१) अभय मुनेश जाधव (८२.४०%) हा प्रथम
२) गोपाल दिलीप चव्हाण (८२%) द्वितीय तर
३) ओमकार अतुल येलेबोईनवाड (८०.८०%) गुण घेऊन तृतीय क्रमांक पटकावला.
सेमी इंग्रजी माध्यमातून गणित विषयांमध्ये १०० पैकी १०० गुणांसह कु. प्रेरणा नागसेन तामगाडगे या विद्यार्थिनीने दैदीप्यमान यश संपादन केले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे सचिव अभि. प्रशांत ठमके, कोषाध्यक्षा शुभांगीताई ठमके, मुख्याध्यापक तथा प्राचार्य प्रमोद मुनेश्वर, उपप्राचार्य श्याम जाधव, उपमुख्याध्यापक किशोर डांगे पर्यवेक्षक प्रा. संतोष बैसठाकुर, प्रा रघुनाथ इंगळे, मनोज भोयर, मुकुंद मुनेश्वर आणि सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी, आदींनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
Tags
||जिल्हा||
%20(18).jpg)