मातोश्री कमलताई ठमके या नामांकित इंग्रजी माध्यामिक विद्यालयातील मुलांचा १० वीचा  ९६ टक्के निकाल

 

किनवट : तालुक्यातील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या मातोश्री कमलताई ठमके विद्यालयातील बहुतांशी आदिवासी विद्यार्थी असलेल्या इयत्ता १० वी इंग्रजी माध्यमाचा 96.05 टक्के निकाल लागला असून येथील राठोड ओंकारेश्वर दत्ता याने ९५.०० टक्के गुणांसह विद्यालयातुन सर्वप्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे.

 तसेच कु. सिडाम रत्नश्री संजय ९४.८० टक्के गुणांसह ही व्दितीय तर पवार आदित्य पुरसिंग याने ९४.४० टक्के गुणांसह विद्यालयातून तृतीय क्रमांक पटकावला आहे.

परीक्षेस एकूण २०३ विद्यार्थी प्रविष्ट होती पैकी १९५ ही विद्यार्थी उत्तीर्ण झाली आहेत.विशेष बाब म्हणजे १९५ विद्यार्थ्यांपैकी ११ विद्यार्थ्यांनी ९० टक्के पेक्षा अधिक, ७५ टक्के पेक्षा ४० आणि ६० टक्के पेक्षा जास्त ७० विद्यार्थ्यांनी गुण मिळवले आहेत. 

मातोश्री कमलताई ठमके बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, गोकुंदा व्दारा संचलित  मातोश्री कमलताई ठमके इंग्रजी माध्यमिक विद्यालय कोठारी (चि) येथील विद्यार्थ्यांनी यावर्षी घवघवीत यश संपादन केले आहे. 

इंग्रजी माध्यमातून सर्वच विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेत केलेली ही नेत्रदीपक कामगिरी निश्चित कौतुकास्पद आहे. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अभि. प्रशांत ठमके, सचिव शुभांगीताई ठमके, प्राचार्य, शिक्षकवृंद व सर्व कर्मचारी यांच्यासह सर्व स्तरातून यशवंत विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.

Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp