नांदेड, ता. १७ : पंचशील प्रतिष्ठाण, नांदेड यांच्या वतीने “बौद्ध विवाह मेळावा नांदेड-२०२६” चे आयोजन शुक्रवार, दि. ५ जून २०२६ रोजी दुपारी १२:२५ वाजता चांदोजी पावडे मंगल कार्यालय, डी-मार्ट रोड, नांदेड येथे करण्यात आले आहे. समाजातील वधू-वरांना साधेपणाने, पारदर्शक व शिस्तबद्ध पद्धतीने विवाहबंधनात अडकविण्याच्या उद्देशाने हा भव्य मेळावा आयोजित करण्यात येत आहे.
या विवाह मेळाव्यासाठी वधू नोंदणी शुल्क ३००० रुपये तर वर नोंदणी शुल्क ४००० रुपये निश्चित करण्यात आले आहे. नांदेड शहरासह जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील बौद्ध समाजातील नियोजित वधू-वरांनी मोठ्या संख्येने नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
पंचशील प्रतिष्ठाणच्या वतीने विविध समित्यांची स्थापना करून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून हा विवाह मेळावा आयोजित करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. यापूर्वी २०२३ मध्ये १९ जोडपी, २०२४ मध्ये २७ जोडपी तर २०२५ मध्ये २९ जोडप्यांचे विवाह यशस्वीरीत्या संपन्न करण्यात आले होते. या विवाह सोहळ्यांची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा झाली होती. यावर्षीही त्याच उत्साहात आणि भव्यतेने विवाह मेळावा पार पडणार असल्याचे आयोजकांनी नमूद केले.
मेळाव्याचे अध्यक्ष म्हणून इंजि. अशोकराव येरेकर, सचिव इंजि. आर. बी. मादळे, उपाध्यक्ष भगवानराव धबडगे व यशवंतराव उबारे, सहसचिव इंजि. प्रशांत ठमके, कोषाध्यक्ष अॅड. गौतमराव कांबळे तसेच संयोजक इंजि. भरतकुमार कानिंदे कार्यरत आहेत.
वधू-वर नोंदणीसाठी उपा. गणपतराव गायकवाड (मो. ९५२७८८१९०१), उपा. सा. ना. भालेराव (मो. ९८५००५२१२५), उपा. विजय रावळे, उपा. साहेबराव पुंडगे, उपा. भास्कर भगत, उपा. रवि चिखलीकर यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
समाजातील ज्येष्ठ, अनुभवी सामाजिक कार्यकर्ते, महिला व पुरुषांच्या सहकार्याने हा विवाह मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, जास्तीत जास्त वधू-वरांनी नावनोंदणी करून या उपक्रमास प्रतिसाद द्यावा, असे आवाहन पंचशील प्रतिष्ठाण, नांदेडच्या वतीने करण्यात आले आहे.
Tags
||महाराष्ट्र||