किनवट, ता. २७ : महाराष्ट्र शासनाकडून अनुसूचित जाती प्रवर्गाच्या उपवर्गीकरण करण्याच्या हालचालींविरोधात राज्यस्तरीय ऑनलाइन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. “मनुवादी षडयंत्राचा विरोध” या विषयावर होणारे हे चर्चासत्र गुरुवारी २८ मे २०२६ रोजी सायंकाळी ७ ते १० या वेळेत झूमद्वारे पार पडणार आहे.
या चर्चासत्रात राज्यातील विविध क्षेत्रातील विचारवंत, माजी न्यायाधीश, साहित्यिक, पत्रकार, प्राध्यापक आणि सामाजिक कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. रिपब्लिकन सेना मुंबईचे प्रमुख मा. आनंदराज आंबेडकर, माजी मंत्री मा. नितीन राऊत, माजी UGC अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात, माजी न्यायाधीश मा. अनिल वैद्य, पत्रकार मधु कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर या चर्चासत्रात मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमाचे संयोजन पूजनीय भंते पद्मानंद यांनी केले असून, संविधान संरक्षण, सामाजिक न्याय, समता आणि बंधुता यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
ऑनलाइन चर्चासत्रासाठी झूम लिंक आणि मीटिंग आयडी आयोजकांकडून प्रसिद्ध करण्यात आला असूनञ राज्यभरातील कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Tags
||महाराष्ट्र||
