रास्तभाव दुकानदारांच्या मार्जिनवाढीच्या निर्णयाचे स्वागत; केंद्रीय मंत्रिमंडळाचे फेडरेशनकडून अभिनंदन

 किनवट, ता. २९ (बातमीदार): भारत सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) अधिक सक्षम, पारदर्शक व तंत्रज्ञानाधारित करण्यासाठी ‘सार्थक पीडीएस (SARTHAK PDS)’ ही कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित डिजिटल प्रणाली लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तसेच देशभरातील रास्तभाव धान्य दुकान परवानाधारकांच्या दीर्घकालीन मागणीची दखल घेत त्यांच्या मार्जिनमध्ये वाढ करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

या निर्णयाचे ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकीपर्स फेडरेशन (रजि.) यांनी स्वागत केले असून केंद्रीय मंत्रिमंडळाचे अभिनंदन केले आहे. फेडरेशनचे राज्याध्यक्ष गणपत डोळसे पाटील, जनरल सेक्रेटरी बाबुराव म्हमाणे तसेच राज्यातील विविध जिल्हा, शहर व तालुका संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत करत तो रास्तभाव दुकानदारांसाठी दिलासादायक असल्याचे म्हटले आहे.
     फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, AI आधारित सार्थक पीडीएस प्रणालीमुळे सार्वजनिक वितरण व्यवस्थेत अधिक पारदर्शकता, कार्यक्षमता आणि लाभार्थ्यांना वेळेवर सेवा मिळण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर परवानाधारकांच्या मार्जिनवाढीमुळे वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर रास्तभाव दुकानदारांना आर्थिक आधार मिळणार आहे.
    यावेळी फेडरेशनच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव आणि अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांचे विशेष आभार मानण्यात आले. राज्यातील सर्व रास्तभाव दुकानदारांच्या वतीने केंद्रीय मंत्रिमंडळाला हार्दिक शुभेच्छा

व अभिनंदनही व्यक्त करण्यात आले. 
Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp