गरीब विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाची सुवर्णसंधी; आंबेडकरवादी मिशनची राज्यस्तरीय प्रवेशपूर्व परीक्षा २६ जूनला


नांदेड, ता. २ : आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दीपक कदम यांच्या त्यागातून उभारण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा चळवळीअंतर्गत सर्व जाती-धर्मातील विद्यार्थ्यांसाठी UPSC व MPSC मार्गदर्शन वर्गाच्या प्रवेशासाठी राज्यस्तरीय प्रवेशपूर्व परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. ही परीक्षा दि. २६ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजता आंबेडकरवादी मिशन, सिडको, नांदेड येथे होणार आहे.

    या प्रवेशपूर्व परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना सहा महिन्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. खाजगी क्लासेसच्या तुलनेत केवळ ५ टक्के देणगी शुल्कावर प्रवेशाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच दिल्ली येथील सुप्रसिद्ध Next IAS संस्थेचे UPSC मार्गदर्शन निशुल्क उपलब्ध करून देण्यात येणार असून MPSC मार्गदर्शन वर्गाचीही सुविधा राहणार आहे.
    विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र व सुरक्षित मुला-मुलींची वसतिगृहे, २४ तास अभ्यासिका, ग्रंथालय, नोट्स, टेस्ट सिरीज, मेस सुविधा तसेच यशस्वी अधिकाऱ्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे. व्यक्तिमत्त्व विकासासाठी विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजनही करण्यात येणार आहे.
आंबेडकरवादी मिशनच्या माध्यमातून आतापर्यंत १८५ IAS, IPS, IFS, IRS व इतर अधिकारी, २५० PSI, २५० वर्ग-१ व वर्ग-२ अधिकारी, ६५ बँक पीओ तसेच १००० हून अधिक क्लार्क, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस आदी सरकारी सेवांमध्ये उमेदवारांची निवड झाल्याचा दावा संस्थेने केला आहे.
    प्रवेशपूर्व परीक्षेसाठी नावनोंदणी व अधिक माहितीसाठी ९२७०७६५५५१, ९२७०८६५५५१ व ९३२६९३२०४९ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन आंबेडकरवादी मिशन, सिडको, नांदेड यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp