स्मृतिशेष प्रा. डॉ. हरी नरके राज्यस्तरीय फुले-आंबेडकरी विचारधारा पुरस्कार डॉ. वसंत राठोड यांना

 डॉक्टर वसंत राठोड 

नांदेड : भारतीय पिछडा शोषित संघटन, नांदेड यांच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त, राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंतीनिमित्त तसेच राजमाता अहिल्यादेवी होळकर आणि छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजता विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

   शिवाजीनगर येथील नाना-नानी पार्कजवळील हॉटेल विसावा येथे होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय पिछडा शोषित संघटनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष एस. जी. माचनवार राहणार आहेत.
कार्यक्रमात महाराष्ट्र साहित्य परिषदेचे नांदेड जिल्हाध्यक्ष बालाजी ईबितदार हे "राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या कीर्तनातील आशय" या विषयावर प्रमुख व्याख्यान देणार आहेत. तर प्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ. शंकर विभुते हे "राजमाता अहिल्यादेवी होळकर आणि राजर्षी शाहू महाराज यांचे समाजकार्य" या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
यावेळी सामाजिक व वैचारिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल 'स्मृतिशेष प्रा. डॉ. हरी नरके राज्यस्तरीय फुले-आंबेडकरी विचारधारा पुरस्कार' ज्येष्ठ साहित्यिक व 'कल्लोळकार' डॉ. वसंत राठोड,किनवट यांना प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संभाजीराव धुळगंडे यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे.
  ज्ञभारतीय पिछडा शोषित संघटन, जिल्हा नांदेड यांनी या कार्यक्रमास समाजातील विविध क्षेत्रातील नागरिक, कार्यकर्ते, साहित्यप्रेमी व विचारवंतांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.


Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp