काँग्रेस अनुसूचित जाती ब्लॉक अध्यक्षपदी लक्ष्मीपती दोनपेल्लीवार यांची नियुक्ती

 किनवट, ता. २७ : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने संघटन सृजन अभियानांतर्गत राज्यभर विविध विभागांच्या ब्लॉक अध्यक्ष व ब्लॉक कार्याध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. या नियुक्त्यांमध्ये किनवट अनुसूचित जाती ब्लॉक अध्यक्षपदी लक्ष्मीपती बापूराव दोनपेल्लीवार यांची निवड करण्यात आली आहे.

   महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मान्यतेने हा कार्यालयीन आदेश ता. २५ जून  रोजी जारी करण्यात आला. संघटन सृजन अभियानांतर्गत प्रदेश निरीक्षकांनी जिल्हानिहाय दौरे करून पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्यांच्या अहवालाच्या आधारे सोशल मीडिया, अल्पसंख्यांक, ओबीसी, सेवादल, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच विमुक्त जाती व भटक्या जमाती विभागांच्या विविध ब्लॉक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.
या आदेशानुसार नांदेड जिल्ह्यातील किनवट ब्लॉकसह अर्धापूर, भोकर, मुदखेड, हदगाव आणि हिमायतनगर येथील विविध पदांवरही नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
लक्ष्मीपती दोनपेल्लीवार यांच्या नियुक्तीमुळे किनवट तालुक्यात काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे संघटन अधिक मजबूत होईल, असा विश्वास पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच त्यांच्या निवडीबद्दल काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
लक्ष्मीपती दोनपेल्लीवार


Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp