सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून डॉ. बी. सरवणन यांची नियुक्ती


किनवट, ता. १७(बातमीदार ):
महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार डॉ. बी. सरवणन (२०२३ बँच) यांची किनवट येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (ITDP) कार्यालयात प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

    डॉ. बी. सरवणन हे यापूर्वी जालना जिल्ह्यात सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. आता त्यांची बदली किनवट येथे करण्यात आली असून, आदिवासी विकास विभागाच्या कामकाजाला त्यांच्या अनुभवाचा लाभमिळणार आहे.
   किनवट परिसरातील आदिवासी बांधवांच्या विकास योजना, शासकीय उपक्रम आणि प्रशासकीय कामांना त्यांच्या नियुक्तीमुळे गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp