छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने ‘फुले-शाहू-आंबेडकरी जलसा’ या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा जलसा दि. १९ व २० सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता तापडिया रंगमंदिर, औरंगपुरा, छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे.
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. देवेंद्र फडणवीस, मा. श्री. एकनाथ शिंदे, मा. श्री. अजित पवार आणि मा. अॅड. आशिष शेलार उपस्थित राहणार आहेत.
शुक्रवार, १९ सप्टेंबर रोजी शाहिर देवानंद माळी, सरला वानखेडे, चंद्रकांत प्रल्हाद शिंदे व सपना खरात कलावंत आपल्या सादरीकरणातून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतील.
तर शनिवार, २० सप्टेंबर रोजी विजय सरतापे, अॅड. रागिणी बोदडे, शाहिर राजा कांबळे, चेतन कुमार चोपडे आणि रामलिंग जाधव यांची खास प्रस्तुती होणार आहे.
या दोन दिवसांच्या जलशामध्ये सामाजिक संदेशासोबतच संगीत, शाहिरी आणि सांस्कृतिक वैविध्याचा बहारदार ठेवा रसिकांसमोर सादर होणार आहे.
या कार्यक्रमाला प्रवेश विनामूल्य असून रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाने केले आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘फुले-शाहू-आंबेडकरी जलसा’
byLokaawaj
-
0