“जाती मोजायच्या की गाडायच्या?” पुस्तकाचे दादरमध्ये प्रकाशन — समाजभान जागवणारे मंथन

मुंबई : पत्रकार मधु कांबळे लिखित “जाती मोजायच्या की गाडायच्या?” या पुस्तकाचे प्रकाशन रविवार, दि. १४ सप्टेंबर २०२५ रोजी शिवाजी मंदिर, दादर येथे उत्साहात पार पडले. या प्रकाशन सोहळ्यात सेक्युलर मूव्हमेंटचे अध्यक्ष व ज्येष्ठ विचारवंत प्रा. गौतमीपुत्र कांबळे, संपादक व विचारवंत ज्ञानेश महाराव, साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख, प्रा. अर्जुन डांगळे, दलित महासंघाचे अध्यक्ष प्रा. डॉ. मच्छिन्द्र सकटे, सेक्युलर मूव्हमेंटचे कार्याध्यक्ष व सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त भरत शेळके, प्रा. आनंद बिडकर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रकाशनानंतर झालेल्या खुल्या चर्चासत्रात समाजातील जात-धर्माच्या बेड्या, विषमता आणि सामाजिक ऐक्याच्या प्रश्नांवर तीव्र विचारमंथन झाले. या वेळी साहित्यिक, संपादक, पत्रकार, अभ्यासक तसेच राजकीय व सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या चर्चेला प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाने समाजभान जागवणारे आणि प्रगल्भ संवाद घडवून आणणारे व्यासपीठ निर्माण झाल्याचे मान्यवरांनी मत व्यक्त केले.
Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp