नांदेडमध्ये इंजि. प्रशांत इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थी करिअर मार्गदर्शन मेळावा
September 18, 2025
0
नांदेड : वंचित बहुजन आघाडीचे नेते व युवकांचे खंबीर नेतृत्व इंजि. प्रशांत इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त सम्यक विद्यार्थी आंदोलन, नांदेड जिल्हा यांच्या वतीने विद्यार्थी करिअर मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
हा मेळावा मंगळवार, दि. २३ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी २.०० वाजता कुसुम सभागृह, व्हीआयपी रोड, नांदेड येथे होणार असून जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना याचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी, परभणी चे संचालक मा. विठ्ठल कांगणे सर मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाचे उद्घाटक मा. अशोकभाऊ सोनवणे (राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य, VBA) असतील.
या वेळी महेश भारतीय (सल्लागार समिती सदस्य, सम्यक विद्यार्थी आंदोलन तथा वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय खजिनदार), मा. दीपक कदम सर (आंबेडकरवादी मिशन प्रमुख), मा. आशालता गुट्टे (गुट्टे अकॅडमी), मा. लखन कार्ले (व्हिजन अकॅडमी) यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. तसेच मा. फारुक अहमद (VBA राज्य प्रवक्ता), मा. अमित भुईगळ (वंचित बहुजन युवाआघाडी), मा. कुशल मेश्राम (राज्य कार्यकारिणी सदस्य), मा. कैलास वाघमारे (सम्यक विद्यार्थी आंदोलन राज्य प्रवक्ता) हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमास मा. अविनाश कुमार (IPS), नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक, भदंत पय्याबोधी थेरो, मा. डॉ. रवी एन. सरोदे (परीक्षा नियंत्रक, स्वा.रा.ती.म. दि. नांदेड) तसेच मा. नागोराव पांचाळ (VBA प्रदेश उपाध्यक्ष) यांसह विविध मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
नांदेड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शनाचा हा मेळावा उपयुक्त ठरणार असून, योग्य दिशा व प्रेरणा मिळण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा असल्याचे आयोजकांनी सांगितले या कार्यक्रमाचे निमंत्रक भीमराव सूर्यवंशी (जिल्हाध्यक्ष), अतिश ढगे, मंगेश धोत्रे, नागेश दुधमल, अभय सोनकांबळे, सुजाता पतंगे, रोहित हाटकर, अवंती वनंजे, संतोष थोरात, ऋषभ महादळे, स्वप्नील गच्चे हे आहेत.
Post a Comment
0 Comments