Type Here to Get Search Results !

‘संविधान बचाव’ पदयात्रा २८ सप्टेंबरपासून

नागपूर : महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात संविधान बचाव पदयात्रा २८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. ही यात्रा नागपूरच्या दीक्षाभूमी येथून सुरू होऊन सेवाग्रामपर्यंत जाणार आहे. या यात्रेची तयारी आणि समन्वयासाठी प्रदेश काँग्रेस कमिटीने वरिष्ठ उपाध्यक्ष तथा माजी मंत्री राजेंद्र मुळक यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे. या समितीत माजी मंत्री रणजीत कांबळे, नागपूर शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आमदार विकास ठाकरे, आमदार अभिजित वंजारी, उपाध्यक्ष सुरेश भोयर, प्रदेश सरचिटणीस कुंदा राऊत, शेखर शेंडे, अनंत मोहोड, प्रदेश सचिव रमण चौधरी यांचा समावेश असून समन्वयक म्हणून सरचिटणीस संदेश सिंगलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments