राशन दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ; २६ ऑगस्टपासून नवा दर लागू
September 22, 2025
0
मुंबई : राज्यातील अधिकृत शिधावाटप (रास्तभाव) दुकानदारांना दिल्या जाणाऱ्या मार्जिनमध्ये महाराष्ट्र शासनाने वाढ केली आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या नव्या आदेशानुसार, पूर्वी प्रति क्विंटल १५० रुपयांचे देण्यात येणारे मार्जिन आता २० रुपयांनी वाढवून १७० रुपये प्रति क्विंटल करण्यात आले आहे. हा वाढीव दर २६ ऑगस्ट २०२५ पासून लागू राहणार आहे.
पूर्वीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार केंद्राचा हिस्सा ४५ रुपये, राज्याचा हिस्सा ४५ रुपये व अतिरिक्त राज्याचा हिस्सा ६० रुपये असा होता. सुधारित दर लागू झाल्यानंतर अतिरिक्त राज्याचा हिस्सा वाढवून ८० रुपये प्रति क्विंटल करण्यात आला आहे. २५ ऑगस्ट २०२५ पर्यंत विक्री झालेल्या अन्नधान्याचे मार्जिन मात्र जुन्या १५० रुपयांच्या दरानेच परिगणित केले जाईल.
या निर्णयामुळे राज्यातील शिधावाटप दुकानदारांना आर्थिक दिलासा मिळणार असून अन्नधान्य वितरण योजनेची अंमलबजावणी अधिक सक्षम होण्यास मदत होईल, अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने दिली आहे.
Tags
Post a Comment
0 Comments