पूर्णा : उपाली थेरो नगर येथील बुध्दविहारात शुक्रवारी, दि. २६ सप्टेंबर २०२५ रोजी चक्रवर्ती जी.एस. दादा कांबळे व धम्मप्रचारक लक्ष्मण एकनाथ शिंदे यांच्या धम्मदीक्षा दशकपूर्ती सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. दुपारी १.३० वाजता होणाऱ्या या सोहळ्यात “नवदीक्षित बौध्दांची दशा व दिशा” या परिसंवादातून समाजप्रबोधन होणार आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ मा. डॉ. दिलीप कंधारे (नांदेड) यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थान मा. यादवराव भवरे (उपनगराध्यक्ष, पूर्णा) भूषवणार आहेत. अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष भदन्त डॉ. उपगुप्त महाथेरी आणि भिक्खू पञ्जावंस हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
प्रमुख अतिथी म्हणून मा. डी.एस. नरसिंगे (राज्याध्यक्ष, सत्यशोधक समाज महासंघ), पोलीस निरीक्षक मा. विलास गोबाडे, युवा उद्योजक मा. रितेश मस्के, प्रा. डॉ. संगीता दोंदे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. स्वागताध्यक्ष म्हणून मा. मिलींद कांबळे (महाराष्ट्र पोलीस, परभणी) कार्य पाहणार आहेत.
या सोहळ्यात प्रा. सुकुमार कांबळे (संस्थापक अध्यक्ष, डेमोक्रेटीक पार्टी ऑफ इंडिया), ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत प्रकाश कांबळे, उपनगराध्यक्ष उत्तमभैय्या खंदारे, प्रा. पी.डी. घोडे, नगरसेवक अशोकराव धबाले, अॅड. हर्षवर्धन गायकवाड यांसह अनेक प्रतिष्ठित मान्यवरांचे विचार मार्गदर्शक ठरणार आहेत.
धम्मप्रचारक लक्ष्मण शिंदे यांच्या मुख्य संयोजनाखाली होणाऱ्या या दशकपूर्ती सोहळ्यास परभणी जिल्ह्यातील बौद्ध बांधवांसह विविध क्षेत्रातील सामाजिक, राजकीय आणि उद्योजक वर्गातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
बौद्ध समाजाच्या नूतन पिढीच्या उन्नतीसाठी आणि नवदीक्षित बौद्धांच्या वाटचालीस दिशा देणारा हा सोहळा सामाजिक ऐक्य व प्रबोधनाचा संदेश देणारा ठरणार आहे.
Tags
कार्यक्रम
