पूरग्रस्तांना दिलासा : शासनाकडून २० किलो धान्य व ३ किलो तूरडाळ मोफत वाटपाचा निर्णय
September 29, 2025
0
मुंबई : राज्यातील अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांना मोठा दिलासा देणारा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या परिपत्रकानुसार, महसूल यंत्रणेने पात्र ठरवलेल्या प्रत्येक कुटुंबाला मोफत अन्नधान्याचे वाटप करण्यात येणार आहे.
या निर्णयानुसार, प्रति कुटुंब एकूण २० किलो धान्य (१० किलो गहू व १० किलो तांदूळ) तसेच ५ लिटर केरोसिन मोफत दिले जाणार आहे. मात्र, बाधित भागात गहूपासून पीठ तयार करणे कठीण असल्यास, लाभार्थ्यांच्या मागणीनुसार १० किलो गव्हाऐवजी अतिरिक्त १० किलो तांदूळ देण्यात येणार आहे. अशाप्रकारे, इच्छेनुसार कुटुंबांना २० किलो तांदूळ मिळू शकणार आहे.
याशिवाय, जिल्हाधिकाऱ्यांना पूरग्रस्त कुटुंबांसाठी प्रति कुटुंब ३ किलो तूरडाळ खुल्या बाजारातून खरेदी करून वितरित करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. ही मदत तातडीने पोहोचवून अहवाल शासनास सादर करण्यासही आदेश देण्यात आले आहेत.
Tags
Post a Comment
0 Comments