*गोंदिया-तिरोडा येथे भव्य धम्मध्वज* *यात्रा व जनसंवाद:* *पूज्य भन्ते विनाचार्य यांच्या नेतृत्वाखाली* *बौद्ध मुक्ती आंदोलनाची प्रेरणादायी हाक*
September 20, 2025
0
*गोंदिया-तिरोडा :* बौद्ध मुक्ती आंदोलनाचे प्रणेते पूज्य भन्ते विनाचार्य यांच्या नेतृत्वाखाली गोंदिया व तिरोडा येथे भव्य धम्मध्वज यात्रा आणि जनसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, २१ सप्टेंबर २०२५ रोजी होणारा हा ऐतिहासिक कार्यक्रम समाजाला बौद्ध धम्माच्या विचारांची नवी दिशा देणारा ठरणार आहे.
कार्यक्रमाची सुरुवात दुपारी ३ वाजता आमगाव येथील धम्मगिरी, देवरी रोड येथून होईल. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, मराण्डोली (गोंदिया) येथून भव्य बाईक रॅली काढण्यात येईल. रॅलीनंतर सायंकाळी ६ वाजता गोंदिया येथील मंत्रिय बोप्ट् विहार, भिमनगर मैदान येथे जनसंवाद आयोजित करण्यात आला आहे. तर रात्री ७.३० वाजता तिरोडा येथील शहीद मिश्रा शाळा प्रांगणात मुख्य कार्यक्रम पार पडणार आहे.
या धम्मध्वज यात्रेत विविध समाजघटकांचा उत्स्फूर्त सहभाग अपेक्षित असून, भारतीय बौद्ध महासभेच्या सौ. एकता स्नेहल रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व तयारी पूर्ण झाली आहे.बौद्ध धम्म, सामाजिक समता व मानवमुक्तीचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
Tags
Post a Comment
0 Comments