महाबोधी महाविहार मुक्तीसाठी नागपूरमध्ये भव्य धम्मसभा : १५ हजारांहून अधिक नागरिकांचे निवेदन
September 20, 2025
0
नागपूर : महाबोधी महाविहार मुक्ति आंदोलनांतर्गत नागपूरच्या संविधान चौकात १ जुलै २०२५ पासून सुरू असलेल्या उपासक-उपासिकांच्या आंदोलनाचा भव्य समारोप १७ सप्टेंबर २०२५ रोजी झाला. या दिवशी नागरिकांनी एकत्र येऊन धम्मपाल जयंती, पेरियार रामास्वामी नायकर जयंती तसेच सूर्यपुत्र पंडित कश्यप भैय्यासाहेब (यशवंतराव भीमराव आंबेडकर) स्मृतिदिन उत्साहात साजरा केला.
या कार्यक्रमात नागपूर शहरातील उपासक-उपासिकांसह भिक्खू संघाच्या उपस्थितीत १५ हजारांहून अधिक नागरिकांनी ‘महाबोधी महाविहार मुक्त करा, बी.टी. ॲक्ट रद्द करा’ या मुख्य मागण्यांसाठी निवेदन तयार केले. हे निवेदन १७ सप्टेंबर रोजी भंते डॉ. चंद्रकीर्ती यांच्या नेतृत्वाखाली स्वीकारण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी, १८ सप्टेंबर रोजी हे निवेदन नागपूर जिल्हाधिकारी यांच्याकडे औपचारिकरित्या सादर करण्यात आले.
या आंदोलनात भंते डॉ. चंद्रकीर्ती, भंते श्राद्धामित्र, भंते राहुल बोधी यांच्यासह भिक्खू संघ, उपासक आणि उपासिका मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शांततामय आणि संघटित पद्धतीने झालेल्या या धम्मसभेने नागपूरमध्ये सामाजिक न्याय व बौद्ध धम्ममूल्यांच्या संरक्षणासाठी नवा संदेश दिला
Tags

Post a Comment
0 Comments