कॉ. उज्वला पडलवार यांना 'इंदिरा गांधी आर्यन लेडी' सन्मान

नांदेड : मिमांसा फाउंडेशन, दैनिक समीक्षा, मंथन क्रियटिव्ह ग्रुप, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आणि पत्रकार प्रेस परिषदेच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा यावर्षीचा प्रतिष्ठेचा इंदिरा गांधी आर्यन लेडी पुरस्कार कॉम्रेड उज्वला पडलवार यांना जाहीर झाला आहे. दैनिक समीक्षाचे मुख्य संपादक व कार्यक्रम आयोजक रुपेश पाडमुख यांनी नुकतीच पुरस्काराची घोषणा केली. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या योगदानाचा गौरव व्हावा, या उद्देशाने दरवर्षी हा सन्मान प्रदान केला जातो. यंदा कॉ. उज्वला पडलवार यांच्यासह इतरही मान्यवर महिलांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता नांदेड येथील कुसुम सभागृहात संपन्न होणार असून सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कॉ. उज्वला पडलवार यांना यापूर्वीही अनेक सन्मान मिळाले आहेत. अलीकडेच त्यांना क्रांतिसिंह नाना पाटील राज्यस्तरीय पुरस्कार मिळून बीड येथे गौरव करण्यात आला. त्यांच्या कामगार, कष्टकरी आणि वंचित घटकांसाठी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना अनेक संस्थांकडून पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्या सध्या सीटू कामगार संघटनेच्या राज्य सचिव आणि आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या जिल्हाध्यक्षा म्हणून कार्यरत आहेत. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सीटू नांदेड जिल्हा कमिटीचे जनरल सेक्रेटरी कॉ. गंगाधर गायकवाड यांनी आयोजक रुपेश पाडमुख आणि पुरस्कार वितरण संस्थांचे आभार मानत असल्याचे कळविले. तसेच नांदेड शहर व तालुक्यातील कामगारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. ए
Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp