आशा, गटप्रवर्तकांचे जिल्हा अधिवेशन संपन्न, अध्यक्षपदी उज्वला पडलवार यांची फेरनिवड
October 12, 2025
0
नांदेड : सीटू संलग्न आशा व गटप्रवर्तक फेडरेशनचे जिल्हा अधिवेशन १२ ऑक्टोबर रोजी नांदेड शहरातील लोकमान्य मंगल कार्यालयात थाटात संपन्न झाले.
 सुरुवातीला लोकशाहीर साहित्यरत्न कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून क्रांतिकारी अभिवादन करण्यात आले. यावेळी गगनभेदी घोषणा देत कॉम्रेड अण्णाभाऊ साठे अमर रहे,कॉम्रेड अण्णाभाऊ साठे को लाल सलाम अशा घोषणा देण्यात आल्या.लोकशाहीर कॉ. अण्णा भाऊ साठे यांचा इतिहास बदलू पाहणाऱ्या मनुवादी विचासरणीचा यावेळी धिक्कार करण्यात आला.
 त्यानंतर अधिवेशन परिसरातील प्रांगणात सीटू संघटनेच्या ध्वजाचे ध्वजा रोहन जेष्ठ कामगार नेते कॉ.विजय गाभणे यांच्या हस्ते  करण्यात आले.
 अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी कॉ. उज्वला पडलवार ह्या होत्या, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून संघटनेच्या राज्य अध्यक्षा कॉ. पुष्पा पाटील यांची उपस्थिती होती. मंचावर सीटूचे जनरल सेक्रेटरी कॉम्रेड गंगाधर गायकवाड, उपाध्यक्ष कॉ.शीलाताई ठाकूर, आरोग्य अभियानाचे समन्वयक सिद्धार्थ थोरात, किसान सभेचे नेते किशोर पवार, जमसच्या जिल्हाध्यक्षा लता गायकवाड, सिटू राज्य कमिटी सदस्य करवंदा गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते सुनील भाऊ अनंतवार, वर्षाताई सांगडे, सुनीता पाटील, प्रफुल कऊडकर, चौधरी सर, संगीता गाभने आदींची उपस्थिती होती.
 सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार आशाताईंना सव्वीस हजार पाचशे रुपये मानधन देण्यात यावे अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा राज्य अध्यक्षा पुष्पा पाटील यांनी यावेळी बोलताना दिला.
 कॉ.विजय गाभणे यांनी देखील राज्य आणि केंद्र सरकारवर घणाघाती टीका करत आशा व गटप्रवर्तकांच्या मागण्या सोडवून घेतल्याशिवाय संघटना स्वस्थ बसणार नाही असे मनोगत व्यक्त केले.
 पुढील तीन वर्षाच्या कार्यासाठी नूतन जिल्हा कमिटी निवडण्यात आली असून अध्यक्षपदीकॉ. उज्वला पडलवार, उपाध्यक्षपदीकॉ.गंगाधर गायकवाड, सरचिटणीस पदी कॉ.शीला ठाकूर यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्ष म्हणून वर्षा सांगडे, सुनिता पाटील,सारजा कदम व सविता आढाव याची तर सचिव म्हणून निर्मला जोंधळे, सुरेखा सावंत, लक्ष्मी पवार, जयश्री मोरे व लोचन गायकवाड यांची निवड करण्यात आली. कोषाध्यक्षपदाची जबाबदारी आम्रपाली कांबळे यांच्यावर सोपवण्यात आली.
पुढील तीन वर्षासाठी निवडण्यात आलेली कमिटी एकमताने निवडण्यात आली असून विविध ठराव उपरोक्त अधिवेशनात पारित करण्यात आले आहेत.
अधिवेशन यशस्वी करण्यासाठी कॉ. जयराज गायकवाड, कॉ.सचिन वाहूळकर,कॉ.सुभाषचंद्र गजभारे,कॉ.राहुल नरवाडे आदींनी प्रयत्न केले. 
Tags



Post a Comment
0 Comments