Type Here to Get Search Results !

तरुणांसाठी सुवर्णसंधी : आंबेडकर मिशनतर्फे उद्योजक मार्गदर्शन परिषद

 




नांदेड,ता .३o : सिडको परिसरातील आंबेडकरवादी मिशनतर्फे उद्योजकतेकडे तरुणांना वळविण्यासाठी “उद्योजक मार्गदर्शन परिषद” आयोजित करण्यात आली आहे. हा कार्यक्रम शुक्रवार, दि. ३१ ऑक्टोबर रोजी सायं. ६ वाजता मिशनच्या सभागृहात पार पडणार असल्याची माहिती मिशनचे प्रमुख दीपक कदम यांनी दिली.

या परिषदेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून वैभव वाघमारे (IAS), उपविकास आयुक्त, उद्योग विभाग मार्गदर्शन करणार असून, जिल्हा उद्योग केंद्र व एमआयडीसीतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहून तरुणांना विविध शासकीय योजनांची माहिती देणार आहेत.

उद्योजकांचा गौरव:
यावेळी उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवलेल्या उद्योजकांचा सत्कार करण्यात येणार आहे. या मान्यवरांमध्ये आर. के. सिंग (बुलंदशहर), सी.आर. सांगलीकर, बालाजी कंठेवाड, मारोती कंठेवाड, प्रकाश नगारे, अशोक जोंधळे, माधव डोंपले, मधुकर गच्चे, सूर्यकांत गादेवार सावकार, स्वप्निल नरबाग, प्रदीप वाघमारे, भगवान धबडगे, गौतम कांबळे, देविदास रंगदल, प्रसेनजित वाघमारे, प्रशिक चित्ते, शिवराज टोपे आदींचा समावेश आहे.

स्वावलंबनाकडे पाऊल:
आरक्षणातील मर्यादा आणि सरकारी नोकऱ्यांची घटलेली संधी लक्षात घेता तरुणांनी पीएम योजना, सीएम योजना आणि विविध उद्योग प्रोत्साहन योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन दीपक कदम यांनी केले आहे. त्यांनी तरुणांना या परिषदेचा लाभ घेण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.




Post a Comment

0 Comments