Type Here to Get Search Results !

पंधराव्या जागतिक बौद्ध धम्म परिषदेच्या नियोजनासाठी २ नोव्हेंबरला किनवटमध्ये बैठक

 




किनवट,ता.३०(बातमीदार): पंधराव्या जागतिक बौद्ध धम्म परिषदेच्या नियोजनासाठी २ नोव्हेंबर रोजी किनवट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा प्रांगणात बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत परिषदेसंदर्भातील प्राथमिक नियोजन, कार्यविभाजन आणि पुढील दिशा यावर सविस्तर चर्चा होणार आहे.

मागील १४ वर्षांपासून किनवटमध्ये यशस्वीपणे पार पडलेल्या जागतिक बौद्ध धम्म परिषदांना अनुयायांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. यंदाही फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या पंधराव्या परिषदेसाठी सर्व समाज बांधवांचा सहभाग आणि सूचना लक्षात घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे.

संयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत परिषदेसाठी आवश्यक नियोजन, स्वयंसेवकांची नियुक्ती, तसेच आर्थिक व व्यवस्थापकीय बाबींवर चर्चा केली जाणार आहे. समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून परिषद यशस्वी होण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन संयोजक दया भाऊ पाटील, निखिल कावळे, दिनेश कांबळे, विशाल हलवले, विजय पाटील, राजू कावळे, संदीप दोराटे, अनिल भगत, प्रवीण मुनेश्वर आणि शंकर गायकवाड, प्रतीक कांबळे यांनी केले आहे.

•मिलिंद सर्पे, बातमीदार, किनवट,ता.३०/१०/२०२५-2:15PM


Post a Comment

0 Comments