त्रिशला भगवान मारपवार प्रभाग क्र. ७ मधून रिंगणात : समाजसेवेसाठी निवडणूक लढविण्याचा निर्धार
October 10, 2025
0
किनवट : नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी सुरू असताना, प्रभाग क्रमांक ७ हे अनुसूचित जाती महिला आरक्षित सुटल्याने, या प्रभागातून  त्रिशला भगवान मारपवार यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
सौ. मारपवार यांनी समाजसेवेच्या माध्यमातून लोकांची कामे करण्याची इच्छा व्यक्त करत, “ही निवडणूक मी समाजातील तळागाळातील प्रश्न सोडवण्यासाठी आणि प्रभागाचा विकास वेगाने करण्यासाठी लढत आहे,” असे सांगितले.
मारपवार परिवार हे अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय असून, नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी नेहमीच पुढाकार घेत आले आहेत. प्रभागातील नागरिकांनीच त्यांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरल्याने त्यांनी ही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.
स्थानिकांमध्ये त्यांच्या उमेदवारीचे स्वागत होत असून, विजयी झाल्यास प्रभागातील प्रलंबित विकासकामांना वेग मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
•
Tags

Post a Comment
0 Comments