संविधाननिष्ठांचा आवाज : सरन्यायाधीशांवरील हल्ल्याचा निषेधार्थ मूक मोर्चा
October 11, 2025
0
छत्रपती संभाजीनगर,दि.११ : “आम्ही भारताचे लोक – We, the People of India” या घोषणेने संविधाननिष्ठ नागरिक, डावे, आंबेडकरवादी, समाजवादी, पुरोगामी व परिवर्तवादी संघटनांनी एकत्र येत देशाच्या सरन्यायाधीश  भूषण गवई यांच्यावर झालेल्या तथाकथित सनातनी वृत्तीने प्रेरित हल्ल्याच्या निषेधार्थ मूक मोर्चा आयोजित केला आहे.
हा मोर्चा दि. १४ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता क्रांती चौकातून सुरू होऊन विभागीय आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न होणार आहे.
आयोजकांनी जाहीर केले आहे की, “हा मोर्चा केवळ सरन्यायाधीशांवरील टीकेचा निषेध नाही, तर भारतीय संविधानावर होणाऱ्या प्रत्येक प्रहाराविरोधातील लोकशाही लढा आहे.”
मोर्चात संविधानावर श्रद्धा असलेले हजारो नागरिक सहभागी होणार असून, संविधानिक मूल्यांचे रक्षण आणि न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्यासाठी जनतेचा ठाम निर्धार या मोर्चातून व्यक्त केला जाणार आहे.
6
Tags
Post a Comment
0 Comments