Type Here to Get Search Results !

उमरसरा येथे ६९वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा होणार

यवतमाळ, दि.१४ : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त त्रिरत्न बुद्ध विहार, जुना उमरसरा येथे १४ ऑक्टोबर २०२५ रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. निरजभाऊ वाघमारे (जिल्हा अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी, यवतमाळ) हे भूषविणार आहेत. कार्यक्रमाचे आयोजन प्रज्ञा बहुउद्देशीय संस्था, यवतमाळ यांच्या वतीने करण्यात आले असून, दुपारी १.३० वाजता कार्यक्रमास प्रारंभ होणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मा. प्रा. अशोक तुळशिराम भवरे (नांदेड सिडको) असून ते “बहुजन समाज: आजचे वास्तव, भ्रम आणि उपाय” या विषयावर आपले विचार मांडणार आहेत. संविधान विषयाचे गाढे अभ्यासक म्हणून त्यांचे भाषण ऐकण्यासाठी अनेक सामाजिक कार्यकर्ते व नागरिक उत्सुक आहेत. या कार्यक्रमास कास्ट्राईब कर्मचारी विभागीय अध्यक्ष अमरावती मा. सिद्धार्थ भवरे, मा. डॉ. ज्ञानेश्वर गोरे (गोबरे) — अध्यक्ष, महात्मा फुले सत्यशोधक विद्यापीठ, यवतमाळ, अॅड. गौतम खरतडे — समता सैनिक दल सदस्य, केंद्रीय सल्लागार समिती, मा. राजेंद्र कांबळे — सेवानिवृत्त मुख्याध्यापक, उमरसरा, तसेच मा. महेंद्र मानवतकर — सामाजिक कार्यकर्ता, पार्वती नगर, यवतमाळ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन उत्तमराव कांबळे, सिद्धार्थ बनसोड, उद्धवराव देवतळे, युवराज बनसोड तसेच त्रिरत्न महिला मंडळ, जुना उमरसरा आणि येथील समस्त नागरिकांनी संयुक्तपणे केले आहे. कार्यक्रमास उपस्थित राहून धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा संदेश आत्मसात करावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष उत्तमराव कांबळे व सचिव रंजना कांबळे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments