एस.बी.आय. किनवट शाखेत जेष्ठ व दिव्यांग ग्राहकांसाठी स्वतंत्र सुविधा सुरू करा : ग्राहक पंचायतची मागणी

किनवट : किनवट हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असून येथे स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ची शाखा कार्यरत आहे. या शाखेचे अनेक ग्राहक जेष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्ती आहेत. मात्र, या बँकेत अशा ग्राहकांसाठी कोणत्याही प्रकारच्या स्वतंत्र सोयीसुविधा उपलब्ध नसल्यामुळे त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. बँकेत कामानिमित्त आलेल्या जेष्ठ आणि दिव्यांग नागरिकांना इतर ग्राहकांसोबतच रांगेत उभे राहावे लागते. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर आणि सोयीवर परिणाम होत आहे. शिवाय, काही वेळा बँकेतील कर्मचारी अशा ग्राहकांशी अयोग्य वर्तन करतात, अशाही तक्रारी समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर किनवट तालुका ग्राहक पंचायत या नोंदणीकृत स्वयंसेवी ग्राहक संघटनेचे अध्यक्ष ॲड. मिलिंद सर्पे यांनी एस.बी.आय. प्रशासनाकडे मागणी केली आहे की, “जेष्ठ नागरिक व दिव्यांग ग्राहकांसाठी बँकेत स्वतंत्र काऊंटर, बसण्याची व्यवस्था तसेच प्राधान्याने सेवा देण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात याव्यात.” ग्राहक पंचायत ही मागणी लेखी स्वरूपात लवकरच वरिष्ठ बॅंक व्यवस्थापनाकडे सादर करणार आहे. बँक व्यवस्थापनाने सकारात्मक पावले उचलावीत, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp