Type Here to Get Search Results !

"मिसाईल मॅन डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त किनवट येथे ऑल इंडिया मुशायरा"

किनवट : भारताचे माजी राष्ट्रपती, सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि 'मिसाईल मॅन' म्हणून ओळखले जाणारे भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त एक भव्य ऑल इंडिया मुशायरा आयोजित करण्यात आला आहे. हा मुशायरा बुधवारी(दि.१५) सायंकाळी ७ वाजता, दुर्गा मैदान, किनवट येथे होणार आहे. देशभरातील नामवंत शायर या कार्यक्रमात आपल्या रचनांद्वारे सहभाग नोंदवणार आहेत. या मुशायऱ्यात सहभागी होणाऱ्या प्रमुख शायरांमध्ये महेशर आफ्रीदी (उत्तराखंड), हामीद भुसावली (भुसावळ), वरून आनंद (पंजाब), सतलज इंदोरी (मध्यप्रदेश), जुनेद अख्तर (उत्तर प्रदेश), खालेद नय्यर (अमरावती), अल्तमश तालीब (नांदेड), अरफात अहमद (औरंगाबाद), तौहिद मलनस (किनवट), उज़ेर मुहीब (औरंगाबाद) आणि मुब्बशीर अन्सार (औरंगाबाद) या मान्यवर कवींचा सहभाग असणार आहे. या साहित्यिक संमेलनाचे आयोजन अॅड. माज़ बडगुजर यांच्या वतीने करण्यात आले आहे. डॉ. कलाम यांच्या विज्ञान, शिक्षण आणि राष्ट्रसेवेच्या कार्याचा गौरव करताना काव्यरूपी अभिव्यक्तींचा हा संगम किनवटच्या सांस्कृतिक जीवनात एक संस्मरणीय ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments