Type Here to Get Search Results !

घोगरवाडी येथे ‘स्वच्छता जनजागृती अभियान’ उत्साहात संपन्न टाटा मोटर्स फाऊंडेशन व विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम

िनवट,दि.२० : टाटा मोटर्स फाऊंडेशन आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच्या उत्तमराव राठोड आदिवासी विकास व संशोधन केंद्र, किनवट यांच्या संयुक्त विद्यमाने घोगरवाडी (ता. किनवट) येथे ग्रामपंचायतीच्या सहकार्याने ‘स्वच्छता जनजागृती कार्यक्रम’ उत्साहपूर्ण वातावरणात नुकताच पार पडला. हा उपक्रम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर व प्रभारी कुलगुरू डॉ. अशोक महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रभारी समन्वयक प्रा. डॉ. मार्तंड कुलकर्णी, समन्वयक डॉ. सुनील व्यवहारे व प्रा. डॉ. सुरेंद्र शिंदे यांच्या सहकार्याने राबविण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात शालेय विद्यार्थी व संशोधन केंद्रातील स्वयंसेवकांनी स्वच्छतेची शपथ घेऊन करण्यात आली. त्यानंतर गावात स्वच्छता मोहीम राबवून रस्ते, शाळा परिसर आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली. ग्रामफेरी काढून नागरिकांना व्यक्तिगत आणि सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत जनजागृती करण्यात आली. यावेळी गावचे पाटील सिताराम मडावी, महाजन गणपत गेडाम, तसेच टाटा मोटर्स फाऊंडेशनचे प्रतिनिधी रविंद्रनाथ गुंडेवाड यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले. गुंडेवाड यांनी पर्यावरण संरक्षण आणि स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करत “स्वच्छ गाव, सुंदर गाव” या संकल्पनेशी जोडण्याचे आवाहन केले. संशोधन केंद्राचे प्रा. डॉ. प्रविण खंडागळे यांनी स्वच्छतेचे आरोग्याशी असलेले थेट नाते स्पष्ट करत उपस्थितांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी, महिला व बालके मोठ्या संख्येने सहभागी झाले. शेवटी सर्वांनी ‘स्वच्छ भारत, निरोगी भारत’ या संकल्पनेची शपथ घेत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या उपक्रमात सुनील टेकाम, शत्रुघ्न तुमराम, समाजकार्य प्रशिक्षणार्थी ऋतुजा कऱ्हाळे, पूजा राठोड, धनश्री कावळे, शिल्पा चव्हाण, श्रीनिवास चिल्लावार, ऋतुराज वाळके, साहिल बक्केवार यांच्यासह घोगरवाडी येथील शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता.

Post a Comment

0 Comments