नांदेड : नांदेड येथे दीपावलीनिमित्त अधिकाऱ्यांचा भव्य मेळावा संपन्न झाला. या विशेष मेळाव्यात ५०० हून अधिक वरिष्ठ अधिकारी
उपस्थित होते. राज्यातील विविध विभागांतील अधिकारी, प्रशासकीय अधिकारी तसेच समाजसेवी संस्था प्रतिनिधी यांनी एकत्र येत आपसांत संवाद साधला व स्नेहसंमेलनाचा आनंद लुटला.
या मेळाव्यात बालाजी खतगावकर ( उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वैयक्तिक सहाय्यक), शहाजी उमाप (आयजी), अबिनाश कुमार (आयपीएस, जिल्हा पोलीस अधीक्षक नांदेड), दीपक कदम (मुख्य, आंबेडकरवादी मिशन), श्रीनिवास पाटील (आयएएस), महेशकुमार दोईफोडे (आयुक्त, महानगरपालिका नांदेड), किरण अंबेकर (उपविभागीय अधिकारी, महसूल विभाग), संगीता संगेरवार (उपसंग्रह अधिकारी), रेणुका तमलवार (सहाय्यक आयुक्त), रवीकर (सहाय्यक आयुक्त), उत्तम सोनकांबळे (संयुक्त संचालक), डॉ. मनीष कोकरे (संचालक, एस.जी.जी.एस. संस्था) तसेच श्री. घोडके (उपआयुक्त, पनवेल) आदी मान्यवर उपस्थित होते.
या दीपावली मेळाव्याच्या माध्यमातून विविध विभागांतील अधिकाऱ्यांनी एकात्मतेचा, स्नेहाचा आणि सहकार्याचा संदेश दिला. कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले होते.



Post a Comment
0 Comments