Type Here to Get Search Results !

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीचा जंगी पक्षप्रवेश मेळावा

किनवट,दि.१२: धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या औचित्याने वंचित बहुजन आघाडी, किनवटच्या वतीने मंगळवारी(दि.१४) गोकुंदा(ता.किनवट) येथील सिद्धार्थनगर (आयटीआय जवळ, नांदेड रोड) येथे भव्य जाहिर सभा व पक्षप्रवेश मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. “विकास हवा तर वंचित निवडा : भ्रष्टांना हद्दपार करा”, “जातिवाद मोडून समानतेचा विकास घडवूया” आणि “संविधानाच्या मार्गाने परिवर्तन घडवूया” अशा घोषणांनी हा मेळावा गाजणार आहे. या कार्यक्रमात SC, ST, OBC आणि मुस्लिम समाजातील शेकडो बांधवांचा वंचित बहुजन आघाडीत ऐतिहासिक जंगी पक्षप्रवेश होणार असून, किनवट तालुक्यातील जनतेच्या एकतेचा व परिवर्तनाचा संदेश या मेळाव्यातून दिला जाणार आहे. 🔶 कार्यक्रमाचे वेळापत्रक : 🕙 सकाळी १०:०० धम्म प्रवर्तन दिनानिमित्त ध्वजारोहण – सिद्धार्थनगर महिला मंडळाच्या वतीने. 🕚 सकाळी ११:०० प्रबोधनपर गीत गायन – रमामाता कलामंच सिद्धार्थनगर व प्रसिद्ध शाहीर कैलास दादा राऊत (हदगाव) यांच्या सादरीकरणात. 🕐 दुपारी १:०० ऐतिहासिक जंगी पक्षप्रवेश मेळावा – विविध समाजघटकांचा वंचितमध्ये प्रवेश. 🕓 सायं. ४:०० गोकुंदा सिद्धार्थनगर व मथुरानगर शाखा अनावरण तसेच अजिंक्य इंटरप्राईजेस व अ‍ॅडव्हर्टाईजमेंट ऑफिसचे उद्घाटन. 🌿 प्रमुख मार्गदर्शक व पाहुणे : मा. राजेश्वर हत्तीआंबिरे पालमकर (जिल्हाध्यक्ष, उत्तर नांदेड) मा. दिलीप राव (भोकर तालुका अध्यक्ष) मा. हिदायत खान पठाण (हदगाव तालुका अध्यक्ष) मा. सचिन पाटील (ओबीसी युवा नेता) मा. दीपक मगर, मा. अमर हत्तीआंबिरे, मा. रामराव माळाकोळीकर, अ‍ॅड. सुभाष ताजने, मा. प्रा. विजय खुपसे, मा. सुरेश जाधव, मा. प्रविण गायकवाड, मा. माधव कावळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ✊ वंचितचा निर्धार : “समानतेचा, न्यायाचा आणि विकासाचा एल्गार घडविण्यासाठी, संविधानाच्या मार्गाने परिवर्तन करणे हेच आमचे उद्दिष्ट आहे,” असा ठाम निर्धार वंचित बहुजन आघाडीने केला आहे. या मेळाव्याला किनवट, माहूर, हदगाव व भोकर तालुक्यांतील सर्व वंचित कार्यकर्त्यांनी, सम्यक आंदोलन, समता सैनिक दल, महिला आघाडी व युवा आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. आयोजक: निखिल वाघमारे (तालुका अध्यक्ष, वं.ब.आ., किनवट) 📞 7499656697 प्रकाशक: दुधराम भीजु राठोड, राहुल चौदंते, दिनेश राजाराम कांचळे (वंचित बहुजन आघाडी, किनवट)

Post a Comment

0 Comments